सर्वांना सविनय जय भीम,
निळं वादळ भिमाचं या अँप मध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत..
निळं वादळ भिमाचं हे नाव फेसबुक वर आमचे पेज आहे तिथूनच हे नाव घेण्यात आले.
अँप ची सुरुवात ही भारतीय संविधान प्रास्ताविका पासून आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अँप तयार करण्यामागचा आमचा एकच उद्देश आहे की आपल्या समाजाची व्यवहाराची देवाणघेवाण ही आपल्या समाजातच व्हावी.या करिता हा अँप तयार केला असून. त्याचबरोबर या अँप मध्ये बौद्ध धम्माचा प्रचार व्हावा यासाठी आम्ही बुद्ध पूजा पाठ व वंदना मराठी अर्थासह या अँप मध्ये समाविष्ठ केले आहे. त्याचबरोबर अँप मध्ये बाबासाहेबांचे १०० मौलिक विचार तसेच २२ प्रतिज्ञा आणि बाबासाहेब व त्यांचे जीवनचरित्र हे देखील समाविष्ठ करण्यात आले.
हा अँप आपण कधीही ,कोठेही याचा वापर करू शकता. अशाप्रकारे आम्ही अँप बद्धल थोडक्यात माहिती दिली आहे.
निळं वादळ भिमाचं हा अँप खूप छान आणि रोजच्या दैनंदिन जीवनात याचा वापर करता येईल असा अँप बनविला आहे. तरी आपण सर्वांनी याचा जास्तीत जास्त उपयोग कराल.आणि इतरांनाही सांगाल.अशी अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे निळं वादळ भिमाचं या अँप मध्ये मनःपूर्वक स्वागत..
★सौजन्य :- निळं वादळ भिमाचं★